Pm kisan; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक सहाय्य म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ही योजना राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राबविली जात असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून ओळखली जाते. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आखलेल्या या योजनेमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.
योजनेचे वैशिष्ट्य
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे 6000 रुपये दिले जातात. सध्या शेतकऱ्यांना या योजनेतून पाच हप्त्यांमध्ये 10,000 रुपये मिळाले असून, आता सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून, महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी आतापर्यंत 9,000 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.